Home Top Ad

Responsive Ads Here

The Curfew | अत्यावश्यक सेवा देणार्‍या सर्वांना समर्पित



     दिनांक २२ मार्च, २०२० संपूर्ण मुंबई ओस दिसत होती. मुंबईच काय संपूर्ण जग च शांततेत होत असे संकट सगळीकडे आले होते. एरवी मुंबई बंद करणं हे साध सोप्पं काम न्हवत आणि आजपर्यंत ती बंद केली दोन च  माणसांनी एक म्हणजे सर जॉर्ज फर्नांडिस आणि दुसरे माननीय बाळासाहेब ठाकरे.
   
     परंतु यावेळी कारण वेगळच आणि भयानक होत, इतर वेळी मुंबई बंद झाली तरी इथली लोकल सेवा मात्र कधी थांबली न्हवती, म्हणजे मुंबई संपूर्ण बंद करणं आजपर्यंत कुणाला जमले नसेल असे म्हणायला काही हरकत नाही. तरीही आज बघायला जाल तर मुंबई संपूर्ण बंद आहे, लोकल सेवा बंद आहे, हवाई सेवा बंद  आहेत, यावरून आलेले  संकट किती मोठे आहे हे न कळण्याइतके तुम्ही मूर्ख तर नक्कीच नसाल. प्रत्येक क्षेत्रामध्ये किवा आयुष्यमधे सतत धावपळ करणं मेहनत करणं, प्रगती करणे आवश्यक नसते, प्रगती त्याचीच होते जो थोडावेळ थांबतो आणि पुन्हा भरारी घेतो आपल्या ध्येयाकडे.
   
     आज मुंबई म्हणाल किवा देश म्हणा, त्यासाठीच थांबला आहे, त्याला मोकळा श्वास घेउद्या, हे ही दिवस जातील, परंतु आज थांबला नाहीत तर पुढे भयानक परिस्थिति ओढावेल हे इतर देशांमधील परिस्थिति पाहून एव्हाना तुम्हाला समजले असेलच.
 
    आज कुणालाही डोळ्यासमोर कोणतीही जात दिसत नाहीये, कोणताही धर्म दिसत नाहीये ना ही भाषा, प्रांत, रंग, गरीब श्रीमंत, समोर दिसतोय तो फक्त माणूस आणि माणुसकी, तीच जपा आणि सरकारच्या आदेशाचे पालन करा.
 
     एवढी भयानक परिस्थिति असताना दोन महान हीरो आपल्यासाठी लढताना दिसतात  एक म्हणजे खाकी वर्दी मधील आपला वाघ म्हणजेच पोलिस, आणि दुसरे म्हणजे हॉस्पिटल मध्ये उपचार करताना दिसणारा देव म्हणजेच डॉक्टर. आंगवर वर्दी असली तरी ते माणूसच आहेत,  निदान त्यांचसाठी तरी आपण शासनाच्या नियमांचे पालन करून त्यांना मदत कारला हवी.
बाहेर काम करणार्‍या सर्व  पोलिस बांधव व हॉस्पिटल मध्ये उपचार करत असणारे सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी आणि इतर आत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार .

1 comment: